जिल्हाधिकारी यांच्या धडक कारवाईत आठ अनुज्ञप्तीधारकांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड


- निरिक्षणात आढळल्यास विविध त्रुटया
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
  आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हयातील देशी, विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांचे सखोल निरिक्षण केल्यानंतर आढळलेल्या अनेक विसंगतीमुळे आठ अनुज्ञप्तीधारकांवर विभागीय गुन्हे दाखल करुन जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या सर्व अनुज्ञप्तीधारकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
राज्य उत्पादन विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हयातील देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्यांचे सखोल निरिक्षण केले. या निरिक्षणात कमाल किरकोळ किमतीपेक्षा जास्त दराने मद्यविक्री करणे, सिसिटिव्ही कॅमेरा नसणे, विनामद्य सेवन परवाना मद्यविक्री करणे, अवैद्य ठोक विक्री करणे इत्यादी विसंगती आढळून आल्याने जिल्हयातील आठ अनुज्ञप्तीधारकांवर विभागीय गुन्हे नोंदविण्यात आले. गुन्हा नोंदविण्यात आलेल्या सर्व अनुज्ञप्तीधारकांना जिल्हाधिकारी यांनी  प्रत्येकी 50 हजाराचा रुपयांचा दंड ठोठावला. 
आगामी महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 7 सप्टेंबर 2019 रोजी सर्व अनुज्ञप्तीधारकांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये दैनंदिन मद्यविक्रीची माहिती भरणे, अनुज्ञप्ती विहित वेळे व्यतिरिक्त सुरु न ठेवणे, मद्य सेवन परवानाधारकांनाच मद्यविक्री करणे, अवैद्यरित्या मद्यविक्री न करणे तसेच वरिष्ठांचे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे अशा प्रकारच्या सूचना अनुज्ञप्तीधारकांना देण्यात आल्या. 
विधानसभा निवडणूकीच्या कालावधीदरम्यानही जिल्हयातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे सर्व अनुज्ञप्तीधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच अवैद्य मद्यविक्रीबाबत नागरिकांची कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्र. 18008333333 वर संपर्क साधण्याचे आवाहन  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श.वि. गर्जे यांनी केले आहे.   Print


News - Bhandara | Posted : 2019-09-11


Related Photos