ग्रंथालयामुळे वाचन संस्कृती टिकविण्यास मदत : विनोद तावडे


- ग्रंथालय संचालनालयामार्फत विविध पुरस्कारांचे वितरण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
समाज माध्यमांचा वाढता वापर, बदललेली जीवनशैली  यामध्ये सुध्दा ग्रंथालयाचे महत्व तितकेच आहे. कारण ग्रंथ आणि ग्रंथालय हे शाश्वत असून वाचन संस्कृती ही ग्रंथालयामुळेच टिकून असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 
सन 2016-17, 2017-18 व 2018-19 या तीन वर्षांसाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना डॉ.एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान सोहळा आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे पार पडला. यावेळी विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड, ग्रंथालय प्र. संचालक सुभाष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरस्कारर्थींना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
तावडे यावेळी म्हणाले, वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच ग्रंथालय संचालनालयाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे.आज प्रामुख्याने  सन 2016-17, सन 2017-18 आणि सन 2018-19 या वर्षातील पुरस्कार देण्यात आले. उत्कृष्ट ग्रंथालये म्हणून तीन वर्षातील एकूण 18 ग्रंथालयांना, उत्कृष्ट कार्यकर्ते म्हणून 16 जणांना तर उत्कृष्ट सेवक / कर्मचारी म्हणून 15 जणांना गौरविण्यात आले.
जाहीर झालेले पुरस्कार :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार - 2016-17
शहरी विभाग

सन 2016-17 चा शहरी विभागासाठी  सांगली जिल्हयातील मिरज विदयार्थी संघ यांना अ वर्ग पुरस्कार देण्यात आला. 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
यवतमाळच्या मंगलमुर्ती सार्वजनिक वाचनालयाला ब वर्ग पुरस्कार देण्यात आला. 30 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
नाशिक जिल्हयातील स्वर्गीय कमळाबाई निवृत्ती गिते सार्वजनिक वाचनालयाला ड वर्ग पुरस्कार देण्यात आला. 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
ग्रामीण विभाग
सन 2016-17 चा ग्रामीण विभागासाठी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयास ब वर्ग पुरस्कार देण्यात आला. 30 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
सांगली जिल्हयातीलच जयंत सार्वजनिक वाचनालयास क वर्ग पुरस्कार देण्यात आला.20 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
अहमदनगर जिल्हयातील श्री विश्वेश्वर नाथबाबा सार्वजनिक वाचनालयास ड वर्ग पुरस्कार देण्यात आला. 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार - 2017-18
शहरी विभाग
सन 2017-18 चा शहरी विभागासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर नगर वाचन मंदिर यांना अ वर्ग पुरस्कार देण्यात आला. 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
अहमदनगरच्या दिपा निसळ सार्वजनिक वाचनालयास ब वर्ग पुरस्कार देण्यात आला. 30 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाला ड वर्ग पुरस्कार देण्यात आला. 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
ग्रामीण विभाग
सन 2017-18 चा ग्रामीण विभागासाठी  परभणी जिल्हयातील अनुसया सार्वजनिक वाचनालयाला ब वर्ग पुरस्कार देण्यात आला. 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
जालना जिल्हयातील संत योगानंद सार्वजनिक वाचनालयास ब वर्ग पुरस्कार देण्यात आला.30 हजार रुपये रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
रत्नागिरी जिल्हयातील शिरळ वाचनालयास क वर्ग पुरस्कार देण्यात आला. 20 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार-2018-19
शहरी विभाग

सन 2018-19 चा शहरी विभागासाठी मुंबईतील दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरु हॉल ट्रस्टला  अ वर्ग पुरस्कार देण्यात आला. 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
मुंबईच्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळास ब वर्ग पुरस्कार देण्यात आला. 30 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील स्व. किसनराव इंगळे सार्वजनिक वाचनालयास ड वर्ग पुरस्कार देण्यात आला. 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
ग्रामीण विभाग
सन 2018-19 चा ग्रामीण विभागासाठी  बुलढाणा जिल्हयातील वीर सावरकर सार्वजनिक  वाचनालयाला ब वर्ग पुरस्कार देण्यात आला. 30 हजार रुपये रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
अमरावती जिल्हयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयास क वर्ग पुरस्कार देण्यात आला.20 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील कमलानंद सार्वजनिक वाचनालयास ड वर्ग पुरस्कार देण्यात आला. 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कार-2016-17
राज्यस्तरीय पुरस्कार

लातूर जिल्ह्यातील शादुलहुसेन रुकमोददीन शेख यांना कार्यकर्ता तर याच जिल्ह्यातील श्रीधर स्वामी यांना सेवक पुरस्कार देण्यात आला. या दोघांनाही 25 हजार रुपये रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
विभागस्तरीय कार्यकर्ता पुरस्कार
अमरावती विभाग- अमरावतीचे प्रदीप चौधरी
औरंगाबाद विभाग - नांदेडचे निर्मलकुमार सुर्यवंशी
नागपूर विभाग - गोंदियाचे यशवंत चौरागडे
नाशिक विभाग- धुळयाचे रमेश पाटील
पुणे विभाग-सांगलीचे विष्णू माने
मुंबई विभाग- सिंधुदुर्गचे सीताराम पाटील 
या सर्वांना प्रत्येकी 15 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
विभागस्तरीय सेवक पुरस्कार
औरंगाबाद विभाग- परभणीचे सतिश टाकळकर
नागपूर विभाग- वर्ध्याच्या शीतल देशपांडे
पुणे विभाग- साताऱ्याचे श्यामला पाटणकर
या सर्वांना प्रत्येकी 15 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कार-2017-18
राज्यस्तरीय पुरस्कार
वर्धा जिल्हयातील डॉ. उमाजी नाल्हे यांना कार्यकर्ता तर सोलापूर जिल्हयातील कांतीलाल सांळुके यांना सेवक पुरस्कार देण्यात आला. या दोघांनाही 25 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
विभागस्तरीय कार्यकर्ता पुरस्कार
अमरावती विभाग- बुलढाण्याचे प्रा. किसन वाघ
नागपूर विभाग - गडचिरोलीचे कै. मधुकर हिरापुरे
नाशिक विभाग- अहमदनगरचे संदिप काटे
पुणे विभाग-सोलापूरचे अनिल पाटील
मुंबई विभाग- ठाण्याचे राजेंद्र वैती
या सर्वांना प्रत्येकी 15 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
विभागस्तरीय सेवक पुरस्कार
अमरावती विभाग- अकोल्याचे रामेश्वर पोहेकर
औरंगाबाद विभाग - लातूरचे स्वामी शिवमूर्ती
नागपूर विभाग- गडचिरोलीचे रविंद्र समर्थ
नाशिक विभाग-नाशिकचे विनोद खैरनार
पुणे विभाग- कोल्हापूरचे कै. प्रकाश चुडमुंगे (मरणोत्तर)
या सर्वांना प्रत्येकी 15 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कार-2018-19
राज्यस्तरीय पुरस्कार
लातूर जिल्ह्यातील संजय सुर्यवंशी यांना कार्यकर्ता तर परभणी जिल्ह्यातील मधुकर चौधरी यांना सेवक पुरस्कार देण्यात आला. या दोघांनाही 25 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.
विभागस्तरीय कार्यकर्ता पुरस्कार
अमरावती विभाग- वाशिमचे बाबुसिंग पवार
पुणे विभाग - पुण्याचे ज्ञानेश्वर भोईटे
विभागस्तरीय सेवक पुरस्कार
अमरावती विभाग - अमरावतीचे सुधाकर डोंगरे
नाशिक विभाग- अहमदनगरचे सुभाष भोसले
पुणे विभाग-साताऱ्याचे बाबासाहेब गाडे
मुंबई विभाग- रायगडचे संजय भायदे 
या सर्वांना प्रत्येकी 15 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.

   Print


News - Rajy | Posted : 2019-09-11


Related Photos