महत्वाच्या बातम्या

 विसापूर येथील तपस्या पाटणकर ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलची ७ व्या वर्गाची विद्यार्थीनी तपस्या केशव पाटणकर हिची राज्यस्तरीय बाळ वैज्ञानिक प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. 

या प्रदर्शनाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील जिमखाना येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. तिच्यासोबत मार्गदर्शक तथा मुख्याध्यापक दिनेश वरघणे हे सुद्धा प्रदर्शनात सहभागी होणार आहे. या यशाबद्दल तिचे सर्वदूर कौतुक होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos