महत्वाच्या बातम्या

 चार्जर व हेअर ड्रायरमध्ये लपविले सहा किलो सोने : मुंबई विमानतळावर जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर पाच स्वतंत्र घटनांत विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण ६ किलो ३३ ग्रॅम सोने जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किंमत ३ कोटी ४९ लाख रुपये आहे.

विशेष म्हणजे, सोने तस्करीसाठी या तस्करांनी मोबाईल चार्जर, हेअर ड्रायर, तसेच विशिष्ट प्रकारे शिवून घेतलेले कपडे याद्वारे तस्करी केल्याचे उघड झाले आहे.

या पाचही घटनांत अटक केलेले आरोपी हे भारतीय नागरिक आहेत. परदेशातून मुंबईमध्ये सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न होत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

- विविध देशांतून आलेल्या पाच विमानांच्या बाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. पाच प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांना बाजूला घेत त्यांची चौकशी करण्यात आली.
- त्यापैकी एका प्रवाशाचे कपडे विचित्र पद्धतीचे वाटल्याने त्याची तपासणी केली असता त्याने सोने तस्करीसाठी विशिष्ट खिसे त्या कपड्यात तयार केल्याचे दिसून आले, तर दुसऱ्या घटनेत एका प्रवाशाने चक्क मोबाईलच्या चार्जरमध्ये सोने लपविल्याचे आढळून आले.
- तर तिसऱ्या प्रवाशाने केस सुकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हेअर ड्रायरमध्ये सोने लपविल्याचे आढळले. अन्य दोघांच्या सामानांत सोन्याची पावडर आढळून आली. या पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos