महत्वाच्या बातम्या

 आरबीआय अ‍ॅक्शन मोडवर : ४ बँकांवर कठोर कारवाई करत ठोठावला दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चार सरकारी बँकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. या सहकारी बँकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने आरबीने त्यांच्यावर कठोर कारवाठई करत भरभक्कम दंड ठोठावला आहे. आरबीआयने ८ फेब्रुवारी रोजी एक पत्रक काढत याबाबत माहिती दिली.

आरबीआयने नकोदर हिंदू अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक, जोरोस्ट्रियन को-ऑपरेटीव्ह बँक, बॉम्बे मर्केंटाईल को-ऑपरेटीव्ह बँक आणि द नवनिर्माण को-ऑपरेटीव्ह बँकेवर कारवाई करत लाखोंचा दंड ठोठावला आहे. एक्सपोजर नॉर्म्स आणि इतर निर्बंधांचे पालन न केल्याने आरबीआयने बॉम्बे मर्केंटाईल को-ऑपरेटीव्ह बँकेला ६३.३० लाख रुपयांचा, तर डिपॉझिट खाती, ठेवींवरील व्याजदर आणि यूसीबीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी जोरोस्ट्रियन को-ऑपरेटीव्ह बँकेला ४३.४० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर उत्पन्नाची ओळख, मालमत्ता आणि इतर संबंधित बाबींवर जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे नकोदर हिंदू अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेला ६ लाख रुपये आणि द नवनिर्माण को-ऑपरेटीव्ह बँकेला १ लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच सर्व बँकांना नोटीसही जारी करण्यात आली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos