धर्मराव कृषी विद्यालयात अहेरी केंद्राची तीसरी शिक्षण परिषद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
समुह साधन केंद्र अहेरी व्दारा अहेरी केंद्राच्या शिक्षण परिषदचे आयोजन स्थानिक धर्मराव कृषी विद्यालयात आज ११ सेप्टेंबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी प्राचार्य महंत   होते. उद्घाटन केंद्र प्रमुख सुधाकर घोसरे यांच्या हस्ते करण्यात आले. 
प्रमुख अतिथी म्हणून सुलभक श्रावन दुर्गे, मुख्याध्याप कसंतोष जोशी यांची उपस्थिती होती.
  सुरवातीला मागील शिक्षण परिषदेत घेतलेल्या विषयाचा आढावा केंद्र प्रमुख सुधाकर घोसरे यांनी  घेतला. तसेच त्यानी नेटवर्क पाॅवर प्रोजेक्ट व्दारे रीड टू मी चा वापर करून शाळेत कसे अध्यापन करायचे याचा नमुना पाठ सादर केला.
 गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची ओळख अंतर्गत भाषा व गणित या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यानी अहेरी केंद्रातील शाळा कोणत्या श्रेणीमध्ये आहेत याचा आढावा घेतला. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शाळा राबवीत असलेल्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. आवश्यक सुचना दिल्यात. सुलभक श्रावन दुर्गे यांनी आनापान प्रक्रिया व त्याची ओळख या बाबतचे मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पतीवर आधारीत नमुना पाठ कविता राऊत या शिक्षीकेने सादर केला.शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम व त्याचा विद्यार्थीना प्रत्यक्ष होणारा लाभ या बाबतचे मार्गदर्शन उपक्रमशिल शिक्षक संजय कोंकमुट्टीवार यांनी केले. या शिक्षण परिषदेचा लाभ केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या अठ्ठाविस शाळेतील नव्वद शिक्षकांनी घेतला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos