चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करुन अंधकारमयजीवन प्रकाशमय करेल. चैत्यभूमी ही भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. सर्वांना बरोबरघेवून जाण्याचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपण आत्मसात केलापाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीकेले. दादर येथील चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचेउद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्यायमंत्रीडॉ.सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आठवले बोलत होते. 
आठवले म्हणाले, चैत्यभूमीचे सुशोभिकरण लवकरच केले जाईल. भव्य दिव्य असास्तूप उभारला जाईल, इंदू मिल येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकहीलवकरच पूर्ण करण्यात येईल.
डॉ.खाडे म्हणाले, चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारुन लाखो भीम अनुयायांचे स्वप्नपूर्ण झाले आहे. बाबासाहेबांचे विचार सर्वांना समजले पाहिजे त्यासाठी ही भीमज्योतप्रेरणा देणारी आहे. राज्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक पुतळ्यासमोर भीमज्योतउभारण्यासाठी शासन प्रयत्न करेल.
सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर म्हणाले, चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांचा मरणोत्तर उचित सन्मान राखला जात आहे. आपल्याबरोबर देशातील सर्व घटक यात सहभागीहोत आहेत. ही आनंदाची बाब आहे. चैत्यभूमीचे सुशोभिकरण करण्याचे शासन स्तरावरप्रयत्न केले जातील.
यावेळी महात्माफुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा उर्फ सुधाकर सरवदे, खासदारराहुल शेवाळे, आमदार भाई गिरकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तआबासाहेब जऱ्हाड, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे, पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.

 



  Print






News - Rajy | Posted : 2019-09-11






Related Photos