‘दिलखुलास’ कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची 'विकासाला आर्थिक बळ' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. १२ आणि शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्याची वित्तीय स्थिती, वित्तमंत्री म्हणून वेगळेपण सांगणारे घेतलेले  निर्णय,  विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या विशेष पॅकेजची अंमलबजावणी, विशेष सहाय्य योजनांसाठी वाढवलेले अनुदान, हरित महाराष्ट्राच्या ध्यासाने लोकसहभागातून आखलेला ५० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम, वृक्षलागवडीतून रोजगार निर्मिती आणि उत्पन्नवृद्धी यासाठी राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, निसर्ग पर्यटनाकडे लोकांचा वाढलेला कल पाहता याला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी वन विभागाने  घेतलेले निर्णय आदी  विषयाची  माहिती श्री. मुनगंटीवार यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

 



  Print






News - Rajy | Posted : 2019-09-11






Related Photos