शिक्षक दिनाचे औचित्य साधुन भारत सरकारच्या भरती प्रक्रीयेविषयी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शिक्षक दिनाचे औचित्य साधुन ५ सप्टेंबर  रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज येथे भारत सरकारच्या संरक्षण विभाग आर्मी, नेव्ही एअरफोर्स, मर्चट नेव्ही विभागाची माहिती तसेच केंद्रीय संरक्षण दले व भारत सरकारच्या इतर उपक्रमांतील भरती प्रक्रीयेची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली व त्यामध्ये अगदी आदिवासी ग्रामीण भागातील मुले-मुली सुद्धा राष्ट्रीय पातळीवर जाऊन देशसेवा करण्याची संधी प्राप्त करु शकतात, असे मार्गदर्शन करण्यात आले. 
  सैन्य दलात अगदी सैनिक पदापासुन ते सैन्यधिकारी या पदावर रुजु होणेकरीता लागणारे शैक्षणिक व शारीरीक पात्रता याबद्दल मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. आणि प्रशिक्षणार्थ्यांना देशसेवा करण्याकरीता प्रेरणादायी वक्तृत्व करुन देशसेवेसाठी प्रेरीत करण्यात आले.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष औ.प्र.संस्था. देसाईगंज चे प्राचार्य विकास आडे हे होते. प्रशिक्षणार्थ्यांना  मार्गदर्शन  प्रमुख अतिथी म्हणुन मर्चट नेव्हीत कार्यरत असलेले राजेश डुंबरे व अक्सर सुतार यांनी केले. कार्यक्रमांला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिल्प निदेशक तसेच सर्व व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी , गटनिदेशक  रविकांत गोतमारे उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos