महत्वाच्या बातम्या

 माता रमाई आंबेडकर जयंती दिनानिमित्य मलेझरी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व बौद्ध समाज मलेझरी यांच्या वतीने रोजी ७ फेब्रुवारी २०२४ ला विहाराच्या प्रागंणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मरिया कोरडे (पो.पा.) आणि अध्यक्ष म्हणून विनोद झाडे व उपाध्यक्ष म्हणुन पौर्णिमा संदीप निमसरकार हे उपस्थित होते.

जयंती कार्यक्रमानिमित्य मुले व महिला यांचे स्पर्धा घेण्यात आले. तर सायंकाळी गावातील मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्याना शिल्ड देण्यात आले. पुढील कार्यक्रमाचे आयोजक गौरव उराडे व काजू दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. 

मुलांना व स्त्रियांना प्रोत्साहन पर बक्षीस  म्हणुन सह्याद्री इन्स्टिट्यूट यांच्याकडून सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश गलबले, प्रमाग गलबले, राहुल बावणे, सुजल वणकर व दिनेश जिवने तसेच राजे छ. शिवाजी महाराज संघ, आदीवासी, गोड- गोवारी युवा संघटना व संविधान युवा मंच यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सहभाग होता. तरी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आकाश नागोसे यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos