गुंतवणूकदारांची पावले सोन्याकडे वळू लागल्याने वर्षअखेरपर्यंत सोने प्रति तोळे ५० हजार रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता


वृत्तसंस्था / मुंबई :  आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदारांची पावले सोन्याकडे वळू लागली असून सोन्याचे दर वर्षअखेरपर्यंत  प्रति तोळे ५० हजार रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. १ हजार ५५० डॉलरवर असलेले प्रति औंस सोन्याचे दर २ हजार डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने वर्तवली आहे. सध्या सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर सुमारे ३९ ते ४० हजारांच्या आसपास आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति औंस १ हजार ५५० डॉलर प्रमाणे १ लाख ८ हजार ५०० रुपये प्रति ग्रॅम म्हणजे सुमारे ३ हजार ८२७ रुपये, इतके सोन्याचे सध्याचे दर आहेत. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम आणि १ डॉलर म्हणजे ७० रुपये). हे दर प्रति औंस दोन हजार झाल्यास सोन्याची किंमत प्रति तोळे ५० हजारांच्या आसपास पोहोचणार आहे.  सध्या भारतासह जगभरात मंदीने आपले बस्तान बसविल्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत असून, प्रॉपर्टी बाजारही थंड पडले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांना आकर्षक आणि सुरक्षित वाटू लागली आहे.



  Print






News - Rajy | Posted : 2019-09-11






Related Photos