शरीरसंबंधास नकार दिल्याने नागपुरात सीआरपीएफ जवानाचा पत्नीवर हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्याने सीआरपीएफच्या जवानाने  पत्नीवर बॅटने हल्ला केल्याची घटना शांतीनगरमधील प्रेमनगर भागात मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जवान केंद्रीय राखीव पोलिस दलात असून जम्मू-काश्मीर येथे तैनात आहे. तीन दिवसांपूर्वी तो घरी आला. मंगळवारी जवान व त्याच्या पत्नीने जेवन केले. त्यानंतर जवानाने शरीरसंबंधाची मागणी केली. जवानाच्या पत्नीने शरीरसंबंधास नकार दिला. त्यामुळे संतप्त होऊन जवानाने पत्नीच्या डोक्यावर बॅटने हल्ला केला. वेळीच जवानाच्या पत्नीने हात आडवा केला. तिच्या हाताला दुखापत झाली. तिला सेंट्रल एव्हेन्यूवरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तहसील पोलिसांना घटनेची माहिती दिली. तहसील पोलिसांनी जखमींची साक्ष नोंदवून शांतीनगर पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले. शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. बी. उईके यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश गोमासे यांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करून जवानाला अटक केली.  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-11


Related Photos