महत्वाच्या बातम्या

 पंदेवाही येथे माता मंदिर संवरक्षण भिंत आणि सिमेंट रस्त्याचे होणार बांधकाम


- माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील गुरुपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट पंदेवाही येथील माता मंदिर परिसरात संवरक्षण भिंत आणि सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जाणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

पंदेवाही येथील नागरिकांनी गावात मातामंदिर परिसरात संवरक्षण भिंत आणि मंदिराकडे जाण्यासाठी सिमेंट रस्ता बांधकाम करून देण्याची मागणी केली होती.त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि. प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोठी निधी उपलब्ध करून दिल्याने येथील संवरक्षण भिंत आणि माता मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. नुकतेच भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते सदर दोन्ही कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून गावकऱ्यांनी ताईंचे आभार मानले.

भूमिपूजन प्रसंगी माजी प. स सभापती बेबीनरोटी, येमली चे सरपंच ललिता मडावी, माजी जि.प सदस्य ज्ञानकुमारी कौशी, नगर पंचायतचे गट नेता जितेंद्र टिकले,लक्ष्मण नरोटी, राजू नरोटी, संभाजी हीचामी, ग्रा.प. सदस्य मालू पाटील, माजी प.स. सदस्य बालाजी आत्राम, मनोज गावडे, पोलीस पाटील वडु आत्राम, भूमिया धानु आत्राम, ज्ञानेश गावडे, विलास तलांडे, समना कोटावार, मलेश पुलगम, वनिता तलांडे आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos