महत्वाच्या बातम्या

 ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा १५ दिवस शिथिलतेचे : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात २०२४ मधील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी १५ दिवसासाठी मर्यादा शिथील करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश जारी केले आहे.

केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित अधिसूचना २००२ नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी वर्षांमध्ये १५ दिवस निश्चित करून फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुट जाहीर करण्याकरिता पर्यावरण विभागाच्या २२ ऑगस्ट २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती (तारखेप्रमाणे) एक दिवस, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एक दिवस, १७ एप्रिल श्रीराम नवमी एक दिवस, २७ ऑगस्ट गोपाळकाला एक दिवस, ३ सप्टेंबर तान्हा पोळा एक दिवस, १६ सप्टेंबर ईद-ए-मिलाद एक दिवस, १७ ते १९ सप्टेंबर श्रीगणेश उत्सव तीन दिवस, ११ ते १३ ऑक्टोबर नवरात्र उत्सव तीन दिवस, १ नोव्हेंबर लक्ष्मी पुजन एक दिवस, २५ डिसेंबर नाताळ (ख्रिसमस) एक दिवस व ३१ डिसेंबर रोजी एक दिवस असे एकूण फक्त पंधरा दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक याचा वापर सकाळी ६ वाजेपासून तर रात्री १२ वाजेपर्यंत आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून वापर करता येईल, असे आदेशात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos