नागपुरात स्मशानभूमीत नेऊन १३ वर्षीय मुलीवर बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
 जिल्ह्यातील हिंगणा परिसरात १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर गावाजवळील स्मशानभूमीत चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अमित ठाकूर (१८), बलवंत गोंड (२२) यांच्यासह दोन अन्य मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी अमित ठाकूरला अटक करण्यात आली, तर बलवंत गोंड अद्याप फरार आहे. दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार , रविवारी 8 सप्टेंबर रोजी  रात्री पीडित मुलगी शौचास गावाबाहेर गेली होती. तेथून परतत असताना गावातील चौघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. नंतर तिला गावात आणून सोडले.  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-11


Related Photos