महत्वाच्या बातम्या

 रमाई आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत रमाई आवास योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शहरी भागातील लाभार्थ्यांनी संबंधित नगर परिषद किंवा नगर पंचायत व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी संबंधित गटविकास अधिकारी  यांचेमार्फत अर्ज करावयाचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे नावे स्वत:च्या मालकीची जागा असावी. लाभार्थ्यांचे उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी असावे तसेच या याजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा, असे समाज कल्याण विभागाने कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos