पक्ष विस्तासाठी जमाल सिद्धीकी यांना एक संधी देण्याची अल्पसंख्यांक समाजाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
  केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. एकट्या भाजपाचे ३३० खासदार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत  निवडून आले. या सर्वांना निवडून देण्यासाठी अल्पसंख्याक समाजाची मोठी साथ मिळाली. एकवेळ अशी होती की,अल्पसंख्याक समाज भाजपाला मतदान करीत नव्हता.  भाजपाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन या समाजाचा होता. हा इतिहास आहे. पण आता परिस्थितीत बदल झाला आहे.आता हाच समाज भाजपाला भरभरून मतदान करताना दिसतो.
 महाराष्ट्राचा विचार करता अल्पसंख्याक समाजाची मते भाजपाकडे वाळविण्यासाठी तसेच भाजप सरकारची ध्येय धोरणे व निती समजातील लोकांना समजावून सांगण्यात अल्पसंख्यांक मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष जमाल  सिद्धीकी यांची महत्वाची भुमीका असल्याचे अल्पसंख्यांक समाजाचे म्हणणे आहे.  २०१४ साली त्यानी अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष म्हणून सुत्र हाती घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पींजून काढला व भाजपाची अल्पसंख्यांक समाजाप्रती जी निती व या पक्षाची ध्येय धोरणे तसेच भाजप सरकार अल्पसंख्यांक समाजा करिता राबवित असलेल्या कल्याणकारी योजना व त्याची अमंलबजावणी या बाबतची माहिती दिली. जमाल सिद्धीकी हे  आज सुध्दा भाजपासोबत प्रामाणिक व एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम करीत आहेत असे अल्पसंख्यांक मोर्चाचे  अब्बास बेग  यांनी सांगितले.
  अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मुक्कामी राहत त्यानी तेथिल लोकांना शासनाच्या अनेक कल्यानकारी  योजनाची माहिती दिली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा  पींजून काढला.  अतिदुर्गम,संवेदनशील व नक्षल भागात दौरा करणारे ते अल्पसंख्यांक मोर्चाचे पहिले प्रदेश आहेत. जमाल सिद्धीकी यांनी पदावर असताना जिल्ह्यातील खासदार अशोक नेते तसेच तात्कालीन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम व दोन्ही आमदार व बाबुराव कोहळे यांचेशी समन्वयक ठेवला व त्यांच्या सहकार्याने अल्पसंख्यांक समाज पक्षासोबत जोडला.
 जमाल सिद्धीकी हे पक्षासाठी एकनिष्ठ व प्रामाणिक राहून अल्पसंख्यांक समाजाला जोडण्याचे काम त्यानी केले.गडचिरोली जिल्ह्याचे प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाचे अबास बेग व चंद्रपूर जिल्हाचे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष  जुनेद खान यांनी जमाल सिद्धीकी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजाला जोडण्यासाठी विषेश प्रयत्न केले. 
 पण महाराष्ट्रात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष बदलताच अचानकपणे जमाल सिद्धीकी यांना सुद्धा त्यांच्या पदावरुन दुर करण्यात आल्याने अल्पसंख्यांक समाज नाराज होण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका पुढे  होणा-या विधानसभा  निवडणुकीत पक्षाला बसू शकतो. म्हणून पक्षाने जमाल  सिद्धीकी यांचे बाबत घेतलेत्या निर्णयाचा परत एकदा फेरविचार करावा अशी मागणी अब्बास बेग, आमदार व खासदार यांनी केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos