गुजरातमध्ये वाहन दंडात मोठी कपात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
वाहतूक नियम मोडणाऱयांना ताळ्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या दंडवसुलीचा बडगा उगारला असताना गुजरात सरकारने मात्र वाहनचालकांना दिलासा दिला आहे. हेल्मेट परिधान न करणे, सीट बेल्ट न घालणे आदी गुन्हे करणार्‍या वाहनचालकांकडून १ हजारऐवजी ५०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. १६ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे .
गुजरातच्या भाजप सरकारने केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या मोटर वाहन कायद्यात बदल करून वाहनचालकांना दिलासा दिला आहे . गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे . राज्यात आता हेल्मेट परिधान न करणार्‍या तसेच सीट बेल्ट न घालणार्‍या वाहनचालकांकडून १ हजारऐवजी ५०० रुपयांचा दंड वसूल केला जाईल , असे रुपाणी यांनी स्पष्ट केले . वाहतूक नियम मोडणाऱयांकडून अवाचे सवा दंड वसूल करण्यावर रुपाणी यांनी आक्षेप घेतला आहे . सर्वसामान्य नागरिकांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण रुपाणी यांनी दिले आहे.  Print


News - World | Posted : 2019-09-11


Related Photos