मूल रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैनावस्था


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
सर्वसामान्य नागरिकांना कमी पैशात प्रवास करता यावा , या उदेशाने मूल येथील रेल्वे स्टेशन नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून विद्युतीकरण करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली.मात्र या रेल्वे स्टेशन कडे जाणा-या रस्तांची दुरावस्था झाली आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनचालाकंना मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी
लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता सुव्यवस्थित करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणा-या मूल शहरात धानाची मोठी व्यापारपेठ आहे. व्यापारी रेल्वेने लांब अंतरावरील शहरातून विक्रीसाठी वस्तू खरेदी करतात. त्यामुळे मूल रेल्वे स्थानकांवर  प्रवाश्यांची व व्यापा-याची मोठया प्रमाणात गर्दी असते. याच प्रवाशांच्या जोरावर रेल्वे प्रशासन लाखो रूपयांची कमाई करीत आहे.  मात्र ज्या प्रवाश्यांच्या सहाकर्याने रेल्वे प्रशासनाकडे निधी जमा होतो. त्या प्रवाशांच्या सेवेसाठी उदासिन असल्याचा आरोप करीत रस्ता दुरूस्तीची मागणी येथील व्यापारी मायदासानी यांनी केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-11


Related Photos