महत्वाच्या बातम्या

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन इलेक्शन मोडवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीबाबत जिल्हा प्रशासन इलेक्शन मोडवर काम करत आहे. आत्तापर्यंत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आतापर्यंत दर शुक्रवारी दहाहुन अधिक बैठका घेऊन आगामी निवडणूकाच्या बाबत प्रशासन गंभीर असल्याचे दर्शविले आहे. निवडणूक विषय प्रत्येक बाबीची तयारी सूक्ष्म पद्धतीने करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

त्यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, निवडणूक विषयक प्रशिक्षणासाठी लीना फलके, निवडणूक साहित्याचे व्यवस्थापनासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी तर वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रादेशिक कार्यालयाचे राजेंद्र वर्मा माहिती व तंत्रज्ञान विषयाचे नोडल अधिकारी म्हणून संचालक संदीप लोखंडे, मतदानाविषयी जाणीव जागृती व प्रचारासाठी स्वीपचे अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे, कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा विषयक बाबींसाठी लीना फलके, आदर्श आचारसंहिता कक्षासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, खर्चविषयक समितीचे मुख्य कॅफो संतोष सोनी, बॅलेट पेपर, पोस्टल बॅलेट साठी सहाय्यक पुरवठा अधिकारी सचिन डोंगरे, माध्यम व्यवस्थापनासाठी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे,संपर्क व्यवस्थेसाठी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हा उपनिबंधक शुद्धधन कांबळे, मतदार याद्यांचे नोडल ऑफिसर म्हणून ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक विवेक बोंद्रे, वोटर हेल्पलाइन आणि तक्रारीचे निवारण कक्षाचे प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण, आणि निवडणूक निरीक्षक यांची जबाबदारी कार्यकारी अभियंता पीडब्ल्यूडी पराग ठमके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या विभाग प्रमुखांकडे दिलेल्या जबाबदारी व त्यांना दिलेल्या कामांच्या विषयीचे संगणकीय सादरीकरण त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे .तसेच येणाऱ्या संभाव्य अडचणी विषयी देखील प्रत्येक बैठकीत चर्चा करून सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. आगामी वर्षातील लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी व त्याचा आढावा नियमीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर घेत असतात .

त्यामध्ये आतापर्यंत राजकीय पक्षप्रतिनिधींसोबत बैठकी तसेच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणे याबाबतही काम झालेले आहे. या बैठकांमध्ये उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यंत्रणा यांचाही समावेश आहे. निवडणुकांसाठीचे प्रशिक्षण सत्र सुद्धा कालपासून सुरू झाले असून हे प्रशिक्षण नोडल अधिकारी म्हणून लीना फलके यांनी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केलेले आहे. प्रशिक्षणाला सकाळी दहा वाजता वेळेवर सुरुवात होत असून त्याला गैर हजर राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावून जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामात हलगर्जी खपवण्यात येणार नाही हे दाखवून दिले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos