सिंदेवाही तालुक्यात मोहरम निमित्य शरबत व महाप्रसाद वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही :
 तालुक्यातील नवरगाव, अंतरगाव, पळसगाव (जाट), सिंदेवाही (लोनवाही) येथे मुस्लिम नववर्षाच्या इस्लामिक १० तारखेला "यौम-ए-आशूरा" (शहिद दिन) इमाम हसन-हुसेनची आठवण त्यांच्या आहुतिस शांत आणि उपवास करुन श्रधांजली अर्थातच "खिराज-ए-अक़ीदत" वाहण्याचा, देण्याचा दिवस म्हणजेच मुहर्रम या दिवशी संपूर्ण जगातील इस्लाम धर्मीय मुस्लिम समुदाय आपल्या रूढी-परंपरेनुसार, सांस्कृतीक मान्यतेनुसार हा दिवस पाळतात. त्याचेच औचीत्य साधुन सिंदेवाही येथील आशिक ए रसुल ग्रुप, हजरत बाबा चाँदशाह वली मंडळ, ताज बर्तन भंडार तथा मुस्लिम जमात सिंदेवाही च्या वतीने शरबत व महाप्रसाद वितरण करण्यात आले.  
या कार्यक्रमात जनाब अब्दुल कादिर मुशाहिदीन (इमाम- धर्मगुरु ) जामा मस्जिद  सिंदेवाही यांचे प्रमुख मार्गदर्शनात तथा आशिक ए रसुल ग्रुपचे मुख्य संघटक महेबूब शेख व अध्यक्ष तौकीर पठान, जामा मस्जिद सिंदेवाही चे अध्यक्ष इस्माइल शेख व सचिव नासिर जमाल अंसारी, हजरत बाबा चाँदशाह वलीचे अध्यक्ष वहाबभाई सैय्यद व कोषाध्यक्ष जाहिदखा पठान तथा युनुस शेख नगर सेवक आदि उपस्थित होते. याकार्यक्रमाला यशस्वीतेकरिता गुलाम हुसेन शेख, महेबूब शेख, तौकिर पठान, आदिल पठान, साहिल शेख, वजिद कुरेशी, अयान पठान, नोमान पठान, नवाज पठान, शारूक शेख, सोनू पठान, वजिद भाई  वसिम शेख, सोहल शेख, तौफीक शेख, राहिल शेख, ऐनान पटेल, परवेज पठान, इखलाक पठान, अमन पटेल, रेहान शेख, ऐफाज शेख, तयब शेख, फजल शेख, मोनीश शेख, अली सय्यद, वशी भाई, चांद भाई तसेच सर्व समाज बाँधवानी या कार्यक्रमात आपले योगदान देवून सहकार्य केले.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-11


Related Photos