देशातील वाहन उत्पादक कंपन्यांना ओला, उबेरमुळे फटका : अर्थमंत्री सीतारमन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
बीएस-६ आणि ओला, उबेरमुळे देशातील वाहन उत्पादक कंपन्यांना फटका बसला आहे. जीडीपीतले चढउतार विकास प्रक्रियेचा हा भाग असल्याचे सांगत मंदीचे खापर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ओला, उबेरवर फोडले आहे.
देशातील वाहन उद्योगावर सध्या बीएस-6 बरोबरच ओला-उबेर कंपन्यांच्या वाहनांचा वाढत्या वापराचा परिणाम झाला असल्याचे दिसत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले आहे. नवी वाहनं खरेदी करण्यापेक्षा ओला-उबेरच्या वाहनाचा वापर बरा, अशी लोकांची सध्या मानसिकता झाल्याचे दिसत असल्याने वाहन उद्योगासमोर अडचणी निर्माण झाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 
  Print


News - World | Posted : 2019-09-11


Related Photos