महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यात सीसीआयचे सहा कापूस खरेदी केंद्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. याव्यतिरिक्त आष्टी व समुद्रपूर या दोन केंद्रांवर कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे, शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन कापूस पणन महासंघाच्या प्रभारी विभागीय व्यवस्थापकांनी केले आहे.

जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट, वायगाव, सिंदी रेल्वे, सेलू या कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे.

या व्यतिरिक्त सीसीआयमार्फत जिल्ह्यातील आष्टी व समुद्रपूर  या केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असे कापूस पणन महासंघाच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos