महत्वाच्या बातम्या

 वेलगुर येथे माता मंदिर उभारणार : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नागरिकांना दिले आश्वासन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील वेलगुर येथील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गातील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भासत होती. प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पडत असतात. 

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वेलगुर येथील दौऱ्यावर घेले असता दौऱ्यावेळी गावातील सर्व नागरिक माता मंदिर नसल्यामुळे कशा प्रकारचे अडचण भासत होती हे सांगितले. गावातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन अजय कंकडालवार म्हणाले की, आपल्याला शासनाकडून आताचे-आता माता मंदिरासाठी निधी उपलब्ध होत नाही. मात्र स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो, अशी ग्वाही दिले. त्यावेळी समस्त वेलगुर नागरिकांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले. 

यावेळी वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले, अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीता चालूरकर, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अस्याना दुधी, प्रमोद गोडसेलवार, मनोहर पाटील चालूरकर, रवी गवत्रे, काशिनाथ गद्धेकर, प्रफुल ओंदरे, सुळता चाकूरकर, कमला राऊत, गणपत मडावी, वासुदेव मडावी, सुगांदा दुधी, निशा झाडे, मीना जंगमवार, सुनीता बावणे, मारोती बावणे, संजय बावणे, दिलीप दुर्गेसह परिसरातील आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच वेलगुर गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos