जम्मू-काश्मीर हे भारताचंच राज्य असल्याची पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची कबुली


वृत्तसंस्था / जिनिव्हा : जम्मू-काश्मीरवरून पाकिस्तानला त्यांच्याच परराष्ट्र मंत्र्याने खडेबोल सुनावले असून जम्मू-काश्मीर हे भारताचंच राज्य असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी यूएनएचआरसीमध्ये दिली आहे. 
जिनिव्हा येथे ७२ वी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (यूएनएचआरसी) सुरू आहे. या परिषदेला संबोधित करताना शाह महमूद कुरैशी यांनी ही कबुली दिली. जम्मू-काश्मीर भारताचं राज्य आहे, असं सांगतानाच कुरैशी यांनी भारतावर टीकाही केली. काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावांचं उल्लंघन होत आहे, असे धांदात खोटे आरोप करतानाच या परिषदेने काश्मीरमधील मानवाधिकाराकडे लक्ष द्यावे. काश्मीरमध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनासाठी संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही शाह यांनी केली.
त्यानंतर शाह यांनी प्रसारमाध्यमांशीही चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधील जनजीवन सामान्य झाल्याचं जगाला दाखवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. जर असं आहे तर भारत आपल्या जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय मीडिया, एनजीओ आणि सिव्हिल सोसायटींना प्रवेश का देत नाही? असा सवालही त्यांनी केला.  Print


News - World | Posted : 2019-09-10


Related Photos