पवनी येथे भाजपा चा कार्यकर्ता मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी :
भारतीय जनता पार्टी पवनी शहर व पवनी (ग्रामीण) तालुक्याच्या वतीने भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रामचंद्र  वैद्य सभागृह, कोंढा ता.पवनी  येथे करण्यात आला होता.  
याप्रसंगी पालकमंत्री डॉ परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हा अध्यक्ष  प्रदीप पडोळे,  विलास काटेखाये,  जि.महामंञी हेमंत  देशमुख  , मोहन  डोरले,  ता.महामंञी  तिलक वैद्य  ,  बावनकर, जिल्हा सचिव धनराज  जिभकाटे, तालुका अध्यक्ष सुरेंद्र आयतुलवार, शहर अध्यक्ष अमोल तलवारे, डॉ उल्हास  फडके,  प्रकाश कुर्झेकर, संदिप  खंगार,  आशु गोंडाने,   नरेंद्र पहाडे,  रामदास सहारे,   अनिल मेंढे, दत्तु मुनरतीवार, मच्छिंद्र हटवार, देवेंद्र हजारे, लोकेश गभने, डॉ सुनील जीवनतारे, सर्व नगरसेवक, पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
 यावेळी तालुक्यातील विविध पक्षातील २० सरपंच, उपसरपंच, ग्रा,प.सदस्य , आजी माजी पदाधिकारी सहित ९७२ कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. 
याप्रसंगी पालकमंत्री  डाॅ परिणय फुके म्हणाले की, देशाचे पंतप्रधान विकासपुरुष  नरेंद्र  मोदी  आणि राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस  यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून अनेक लोक भाजप या पक्षाशी ज़ूळत असून भाजपा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे. ज्यात १८ कोटी सदस्य असून एक कूटुंब म्हणून सर्वांना सोबत घेवुन काम करीत आहे. 
याप्रसंगी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व सदस्यांचे डॉ परिणय फुके यांनी अभिनंदन केले.  तसेच  भाजप हा पक्ष पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारे वर चालणार पक्ष आहे आणि शेवटच्या व्यक्ति पर्यन्त विकास पोहचायला हवे, असे नमुद केले. 
तसेच पवनी तालुक्यातील आमगाव येथील अन्न-धान्याचे गोदाम आणि पवनी व उपसा सिंचन योजनांच्या कामांचे भूमिपूजन केल्याची माहिती दिली. मागिल ५० वर्षात जीतके विकास कामे झाले नाहीं तितके या ५ वर्षात झाली असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिलक वैद्य यांनी तर संचालन व आभार संदिप खंगार यांनी केले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-09-10


Related Photos