भामरागड येथील पुरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी शेखर सिंह , पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  भामरागड :
  आज पूर ओसरल्यानंतर येथील पुरग्रस्त भागाला आज जिल्हाधिकारी शेखर सिंह , जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश   बलकवडे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांनी भेट दिली दिली . जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांनी  संपूर्ण पुरग्रस्त भागाला भेट दिली व अनेक पुरपीड़ित लोकांच्या घरांची पाहणी केली.  लोकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच पुरग्रस्त लोकांना प्राथमिक स्वरुपात जीवनावश्यक वस्तु तसेच तांदूळ तेल , तेल , तिखट व कपडे , भांडे आदी साहित्य लवकरच वाटप करणार असल्याचे सांगितले .   नागरिकांनी पर्लकोटा नदिवर उंच  पुलाची मागणी केली व व्यावसायिकांनी  दुकानांचा  विमा काढला असून नुकसानभरपाई मिळवून  देण्याची मागणी  व्यापारी संघटनेच्या वतीने केली.  विमा रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. 
 पुरग्रस्त लोकांना आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले.  जिल्हाधिकाऱ्यांनी  भेट दिल्याने येथील लोकांना दिलासा मिळाला आहे. तसेच संपूर्ण पूर परिस्थितीत  तहसीलदार कैलास अंडिल  यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जनतेने तहसीलदार  कैलास अंडिल यांचे आभार मानले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-10


Related Photos