महत्वाच्या बातम्या

 नि:शुल्क प्लास्टिक प्रोसेसिंग व ब्लो मौल्डींग मशीन ऑपरेटर प्रशिक्षण


- ८ फेब्रुवारी रोजी मुलाखतीचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाकरीता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारा प्लास्टिक प्रोसेसिंग व ब्लो मोल्डिंग मशीन ऑपरेटर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षण ९ फेब्रुवारी ते २४ मार्च २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत असून त्याकरीता मुलाखत गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एम.सी.ई.डी.,उद्योग भवन, दुसरा माळा, खोली क्र. २०८, बस स्टॉप समोर, चंद्रपूर येथे पार पडणार आहे.

तरी, इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरीता एम.सी.ई.डी.,उद्योग भवन, कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहावे. तसेच प्रशिक्षणाच्या अधिक माहितीकरीता ०७१७२-२७४४१६  या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर अथवा एम.सी.ई.डी.चे प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांच्या ९६३७५३६०४१ भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos