मॅजिक बसतर्फे सावली तालुक्यात पोषण आहार सप्ताह निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / साखरी : 
 मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन चंद्रपुरच्या वतीने नेस्ले हेल्दी किड्स या कार्यक्रमान्तर्गत सावली तालुक्यात पोषण आहार सप्ताह निमित्य विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये गावातील पालकांनी, मुलांनी सहभाग घेतला. 
  आठवड्याभरात न्यूट्रशन फ्लावर्स, रॅली, फॅशन शो, कुकिंग स्पर्धा, आरोग्य सदृढ़ बॅनर , सापसीडी, वर्कशॉप,गीते व घोषवाक्य द्वारे जनजागृती विविध उपक्रम राबविण्यात आले.  गावात जागतिक पोषक आहार आठवडा साजरा करण्यात आला . या आठवड्यात गावागावात जनजागृती रॅली काढण्यात आली.  तसेच फँशन शो, स्ट्रीट प्ले, साप सीडी गेम च्या माध्यमातून पोषण आहाराचे महत्व पटवून दिले. एक व्यक्ती अनेक लोकांना आहाराचे महत्व पटवून सांगणे, पालकांची कार्यशाळा,गावागावात नुट्रेशन फुल त्यात सात वेगवेगळ्या भाजी लावून हे फुल तयार करण्यात आले. महिलांची पाक कला स्पर्धा अश्या विविध प्रकारचे उपक्रम राबवून पोषक आहाराचे महत्व पटवून देण्यात आले.
 या उपक्रमाला  मार्गदर्शक म्हणून योगिता सातपुते टीएमओ मॅजिक बस, युवा मार्गदर्शक लेखाराम हुलके, देवाजी बावणे,नंदकिशोर पाल व वसंत पोटे  होते.  तसेच गावातील सी वाय एल यांच्या अथक परिश्रमाने उपक्रम यशस्विरित्या पार पडला. सदर कार्यक्रम जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या पुढाकारंने, नियंत्रणात मार्गदर्शनात व संदीप राऊत सहायक व्यवस्थापक-प्रशिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला   Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-10


Related Photos