महत्वाच्या बातम्या

 जिल्हा क्रीडा स्पर्धेतून भविष्यातील राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंची निर्मिती : आ.डॉ. देवराव होळी


- जिल्हा स्तरीय शालेय बाल क्रिडा अधिकारी, कर्मचारी क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धा उद्घाटन सोहळा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : क्रिडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यास मदत मिळत असून अशा जिल्हा क्रिडा स्पर्धांच्या आयोजनातून भविष्यातील राष्ट्रिय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाळुंची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी जिल्हा परिषद गडचिरोली च्या जिल्हा स्तरीय शालेय बाल क्रिडा, अधिकारी व कर्मचारी क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धा उद्घाटन सोहळा प्रसंगी केले.

अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात या जिल्हा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयूषी सिंह, पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे, लॉयड्स मेटल्सचे   कर्नल मेहता, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे सह जिल्हा परिषदेचे वरिष्ट अधिकारी मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार म्हणाले की, अशा जिल्हा क्रिडा स्पर्धेतून १२ ही तालुक्यांतील विद्यार्थी एकत्र येत असल्याने त्यांच्यात आपला जिल्हा हा एक व आपण सर्व एक जिल्ह्याचे हा भाव जागृत होण्यास मदत मिळतो. सोबतच या खेळांमधून शारीरिक, मानसिक व शैक्षणिक विकास होण्यास मोठी मदत मिळते. मागील अनेक वर्षांपासून अशा स्पर्धांचे आयोजन थांबलेले होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना तशी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos