पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १६ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करा - पालकमंत्री डॉ परिणय फुके


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
  बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १६ सप्टेंबर पर्यत शंभर टक्के पूर्ण  करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ परिणय फुके यांनी दिले. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बँकांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश बँक समन्वयकांना दिले. खासदार सुनील मेंढे, आमदार  चरण वाघमारे, अड. रामचंद्र अवसरे, बाळ काशीवार, जिलाधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  रविंद्र जगताप, उप विभागीय अधिकारी भंडारा डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,  अग्रणी जिल्हा प्रबंधक अशोक कुंभलवार सर्व बँकांचे समन्वयक व व्यवस्थापक या बैठकीस उपस्थित होते. या सभेत  या सभेत पीक कर्ज वितरणाचा आढावा घेण्यात आला.  जिल्ह्याला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ४१४.५० कोटी रुपयांचे होते. त्या पैकी बँकांनी  ३५७ कोटी कर्ज वितरण करून ८६ टक्के लक्षांक पुर्ण केले आहे. या प्रसंगी ज्या बँकांनी  ५० टक्के पेक्षा कमी कर्ज वितरित केले. अशा सर्व शाखांचे आढावा घेण्यात आला.  बँकांनी १६ सप्टेंबर २०१९ पर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी बँकांना दिले. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत संपूर्ण माहिती बँकांनी दर्शनी स्थळी लावावे. मुद्रा कर्जचे छापील अर्ज लाभार्थांना उपलब्ध करावे. आणि सर्व कागद पत्राची पूर्तता करून १५ दिवसाच्या आत अर्जाचे निपटारा करावे. असे निर्देश बैठकीत देण्यात आले. त्याचप्रमाणे गरजू व होतकरू तरुणांना मुद्रा कर्ज प्राधान्याने देण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. आपला उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुण तरुणींनी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा. सोबतच बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-09-10


Related Photos