आमदार मा. नानाभाऊ शामकुळे यांच्या हस्ते बाबुपेठ तेली समाज ओपन स्पेसच्या जागेवर सौंदर्यकरणाच्या कामाचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
रविवार दि. ०८/०९/२०१९ ला दुपारी ५ वाजता झोन सभापती सौ. कल्पनाताई बगूलकर यांच्या प्रयत्नातून आमदार मा. नानाभाऊ शामकुळे यांच्या खनिज विकास निधीतुन  बाबुपेठ तेली समाज ओपन स्पेसच्या जागेवर संरक्षण भिंत व सौंदर्यकरणाच्या १५ लक्ष रुपयांचे कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाले. या कार्यक्रमाचे भूमिपूजन चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार  नानाभाऊ शामकुळे यांनी केले. या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या  महापौर सौ. अंजलीताई घोटेकर , झोन सभापती सौ. कल्पनाताई बगूलकर व नगरसेविका सौ. छब्बुताई वैरागडे, नगरसेवक प्रदीप किरमे, तेली समाज बाबुपेठ अध्यक्ष श्रावण खनके, तेली समाज बाबुपेठ कमिटी सदस्य सौ. विमल खनके, श्रीमती लिली पोटदूखे, श्रीमती शेवंता वैरागडे, तैलीक यूवा/यलगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र ईटनकर व महिला अध्यक्षा सौ. चंदा ईटनकर, उपाध्यक्ष रवी लोणकर, सचिव शैलेश जुमडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शुभप्रसंगी तेली समाजाच्या जागेवर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल झोन सभापती सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या हस्ते आमदार नानाभाऊ शामकुळे  यांचे शालश्रीफळ देऊन स्वागत करुन हार्दिक आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला वॉर्डतील हेंमत खनके, प्रशांत खनके, राकेश आंबटकर, नितीन बुटले, मनिष पिपरे, उमंग हिवरे, आशिष वैरागडे, प्रफुल्ल डफ तसेच सौ. अर्चना कांबळे, सौ. मंजुषा पोटदुखे, सौ. मंजू वैरागडे व मोठ्या संख्येने तेली समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-10


Related Photos