भामरागडमधील प्रयास महिला गट करीत आहे दररोज १ हजार व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था


- प्रशासनाचे सहकार्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार/ भामरागड :
तालुक्यात पुरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जवळपास ६० टक्के भामरागड पाण्याखाली गेले होते. यामुळे नागरीकांचे जीवनावश्यक साहित्य पुरामुळे नष्ट झाले. अशावेळी प्रशासनाच्या मदतीने भामरागड येथील प्रयास महिला गटाच्या सदस्यांनी तब्बल १ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. ७ सप्टेंबरपासून या महिलांचे कार्य निरंतर सुरू असून या महिलांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
भामरागडला तब्बल सहाव्यांदा पुराने वेढले. यामुळे जीवमान अस्ताव्यस्त झाले आहे. पुरग्रस्त नागरीकांसाठी महसूल प्रशासन तसेच पोलिस विभाग जीवाचे राण करीत आहे. तर त्यांच्या सोबतीला प्रयास महिला गृप सुध्दा सहभागी आहे. नागरीकांच्या जेवनाची व्यवस्था महिला गटाने उचलली आहे. महिला दररोज स्वयंपाक तयार करून पुरग्रस्तांना जेवन देण्याचे काम करीत आहेत. तहसीलदार कैलास अंडील, उपविभागीय अधिकारी डाॅ. कुणाल सोनवणे व सर्व अधिकारी, कर्मचारी सुध्दा स्वतः स्वयंपाकात मदत करताना दिसून येत आहेत. प्रयास गृपच्या अध्यक्षा शिला येम्पलवार, सचिव भारती ईष्टाम, सहसचिव प्रिती विडपी, सुनंदा आत्राम, गौरी उईके, तारा मडावी, कुटो मडावी, अर्पणा सडमेक, ठुगे मडावी, निर्मला सडमेक ह्या सदस्या मागील ३ ते ४  दिवसांपासून आपले कार्य निरंतर पार पाडत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-10


Related Photos