खासदार नवनीत राणा यांना उच्च न्यायालयाची नोटीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने सोमवारी राणा यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. राणा या पंजाब येथील 'लुभाणा' जातीच्या आहेत. त्यामुळे त्या आरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अपात्र होत्या. तरीही त्यांनी दिशाभूल करून निवडणूक लढविली असून, त्यांना अपात्र करण्यात यावे, अशी याचिकेत विनंती केली आहे. राणा यांना उमेदवारी मंजूर केल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनुसूचित जातीवर अन्याय केला आहे, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला. तेव्हा राणा यांची निवडणूक रद्द करून त्या मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी याचिकेत विनंती केली आहे. त्यावर राणा यांना उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.    Print


News - Nagpur | Posted : 2019-09-10


Related Photos