महत्वाच्या बातम्या

 जिल्हा वार्षिक योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेंतर्गत आतापर्यंत झालेला खर्च तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी विभागांकडून प्राप्त प्रस्तावांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग निहाय मंजुर निधी, आतापर्यंत विभागाकडून प्राप्त मागणी प्रस्ताव व ज्या विभागांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्यांच्याकडून करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेतला. विभागांनी वेळेत आणि उत्तम प्रकारे निधी उपलब्ध करून दिलेली कामे पुर्ण केली पाहिजे, असे यावेळी त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना सांगितले. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी विभागांकडून आराखडे मागविण्यात आले आहे. त्यासाठी बहुतांश विभागांकडून आराखडे प्राप्त झाले असून ज्या विभागांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाही, त्यांनी तातडीने सादर करण्याच्या सुचना देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागास केल्या. जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्याला मंजुर नियतव्यय, आतापर्यंत झालेला खर्च व पुढील वर्षातील आराखड्याची माहिती बैठकीत दिली.





  Print






News - Wardha




Related Photos