महत्वाच्या बातम्या

 देशाची हुकूमशाही आणि आरमोरी विधानसभेची सावकारशाही संपवून सर्वसामान्यांची सत्ता प्रस्तापीत करण्यासाठी प्रयत्न करा : महेंद्र ब्राह्मणवाडे


- आरमोरी तालुका काँग्रेस कमिटी बूथ प्रशिक्षण मेळावा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : देशात वाढत चाललेल्या महागाई मुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. पेट्रोल -गँस- डिझेल सह इतरही जीवनवश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले असताना केंद्र आणि राज्यातील हुकूमशाही भाजप सरकारला कवडीचाही फरक पडलेला नाही, तर दुसरीकडे आरमोरी विधानसभेतील सावकारशाही पुढे जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधीनी आपले गुडघे टेकले असल्याने जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि युवकांच्या समस्यांविषयी  लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

ओबीसीच्या हक्कासाठी काही लोक भाजपात गेले, मात्र १० वर्षे झाला भाजप सत्तेत असतांना देखील सावकारी वृत्तीच्या लोकांनी ओबीसीच्या हक्कासाठी कुठलीही ठोस मागणी केलेली नाही, ते ओबीसीच्या नाही तर स्वतःच्या विकासाकरिता सत्ता बदल केले आणि आता सर्वसमान्य ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहे, आता अश्या हकूमशाही आणि सावकारशाही वृतीच्या लोकांना धडा शिकवून सर्वसामान्य नागरिकांची सत्ता प्रस्थापित करण्याकरिता काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमात कामाला लागा अश्या सुचना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केल्या आहे.

आरमोरी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित तालुकास्तरीय बूथ मेळावा व प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी आ. आनंदराव गेडाम, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, एलडीएम प्रमुख लता पेदापल्ली, प्रशिक्षक प्रणित जांभुळे, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, युवक काँग्रेस अध्यक्ष लारेन्स गेडाम, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, असंघटित कामगार सेल अध्यक्ष छगन शेडमाके, रामदास मसराम, माजी जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, NSUI जिल्हाध्यक्ष निशांत वनमाळी, मुकेश वाघाडे, शालिक पत्रे, अनिल किरमे, वृंदा गजभिये, मंगला कोवे, नीलकंट गोहने, दिगेश्वर धाइत, विश्वेश्वर दरो, रोशनी बैस, मोहन भुते, अतुल आकरे, अंकुश गाडवे, दुर्गा लोणारे, भीमराव बारसागदे, मधुकर दोनाडकर, मुन्ना चंदेल, प्रवीण राहाटे, विजय सूपारे, सूरज भोयर, विनोद बावनकर, बेबीताई सोरटे, अर्चना मडावी, राज नंदरधने, खेमराज प्रधान, नानाजी राऊत, अण्णाजि लिंगायत, राजू नैताम, अरविंद फटाले, वामन धरली, अतुल आखरे, गुड्डू हारगुडे, रवींद्र बनकर, संतोष लाकडे, योजना मेश्राम, सूरज भोयर, रुपेश जोंजलकर, साबीर शेख, आनंदराव राऊत, जावेद शेक, सह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos