जिल्हयातील पुर परिस्थितीवर यंत्रणांनी लक्ष ठेवून राहावे : जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते


- वैनगंगा नदीला आलेल्या पुराची कारधा पुलावर केली पहाणी
- नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा
विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
संतंतधार पावसामुळे मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. भंडारा येथील कारधा पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने आलेल्या पुरपस्थितीची पहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आज ९ सप्टेंबर २०१९ ला सकाळी कारधा पुलाला भेट दिली. यावेळी वैनंगगा नदीच्या काठावरील गावांना  सतर्कतेचा इशारा देत जिल्हयातील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार अक्षय पोयाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास,नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, पोलिस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते. संजय सरोवराचे १० दरवाजे १. ८० मी. ने सोडण्यात आल्याने ७५. ४०० क्यूसेस पाण्याच विसर्ग होत असून यामुळे वैनगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झालेली आहे. भंडारा लागून असलेल्या कारधा नदीच्या पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू झालेला आहे. यामुळे नदीकाठांवरील गावांना धोका निर्माण झालेला आहे. या पुरस्थिीची पहाणी करण्यासाठी वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर आज जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी भेट दिली. यावेळी पुलावरून सुरू असलेल्या पाण्याचा व पुरस्थितीची पहाणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी पांचाळ यांनी पुरस्थितीची माहिती दिली. वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पुरस्थितीची माहिती कंट्रोल रूम ला नियमित दयावी व पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश यावेळी दिले.
वैनगंगेला नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बाधित होवून नागरिकांना पिण्याच्या  पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो याकरिता नगर पालिका प्रशासनाने सज्ज राहावे. नागरिकांना पिण्यायोग्य शुध्द पाणी उपलब्ध करावे असे निर्देश मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना दिले. सोबत शहरातील पुरग्रस्त भागात वैनगंगा नदीचे पाणी शिरकाव झाल्यास येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे व त्यांची काळजी घेण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. कारधा पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून नागरिकांना नदीच्या जवळ जाण्यापासून मनाई करण्यात आलेली आहे. तसेच नदीकाठावरील नागरिकांना पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-09-09


Related Photos