महत्वाच्या बातम्या

 निवडणूक विभागामार्फत फुटाळा तलावावर युथ फेस्टीवल, डॉन्स स्पर्धा ‍आणि मतदार नोंदणी होणार 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : येत्या शनिवारी नागपूर तरुणाईला फुटाळा तलावावर उपस्तित राहण्याची साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे. मतदान नोंदणी सोबत इलेक्शन युथ फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते रात्री ७ पर्यंत होणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील युवकांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने १९ नोव्हेंबर रोजी स्थानिक फुटाळा तलाव येथे दुपारी चार ते सात या वेळेत इलेक्शन युथ फेस्टिवल साजरा करण्यात येणार आहे.
युवा उत्सवामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरीता निवडणूक विभागामार्फत नव मतदार (17 ते 19) वयोगटातील यांच्याकरीता मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. इलेक्शन युथ फेस्टीवल मध्ये वेगवेगळ्या खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात झुम्बा डान्स, लाईव्ह म्युझिकल मल्ल खांब प्रात्यक्षिक, टग ऑफ वॉर, बास्केटबॉल स्पर्धा यांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. फुटाळा म्युझिकल फाऊंटन शोचे निशुल्क आयोजन करण्यात येणार आहे. या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता प्रवेश निशुल्क आहे. कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवामध्ये इयत्ता ११ वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्याकरीता संबंधित विद्यार्थ्यानी त्यांचे महाविद्यालयामध्ये निवडणूक विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या प्रवेश पासेस प्राप्त करून घ्याव्यात.
इलेक्शन युथ फेस्टीवलमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos