छल्लेवाडा येथील बंजारा वॉर्डातील नुकसानग्रस्तांना आविस कडून जीवनावश्यक साहित्याचे वितरण


-  जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय  कंकडालवार यांनी केली आश्वासनाची पूर्तता 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
  तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छल्लेवाडा येथे बंजारा वॉर्डाला लागुन असलेल्या नाल्यामुळे   पुर येवुन घरांमध्ये पाणी साचल्याने घरे कोसळले .  अनेक गरजू वस्तु पुराच्या पाण्यात  वाहुन गेल्या.  शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त कुटुंबावर   मोठे आर्थिक संकट कोसळले . या भागाची जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पाहणी केली. यावेळी जीवनावश्यक साहित्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. यानुसार त्यांनी साहित्य गरजूंना वितरित केले आहे. 
 माजी आमदार दिपक  आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय  कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली तांदूळ  दाळ,  तेल जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, जिल्हा परिषद सदस्य सुनिताताई कुसनाके,पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम, कमलापुर च्या सरपंच रजनीताताई मडावी, सामाजिक कार्यकर्ते सतोष  ताट्टीकोंडावार  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य विलास बोरकर  रेपनपल्ली,शंकर भसारकर, दासु कांबळे समाजिक कार्यकर्ते, चंद्र गुरनुले, रामा सभावर,  वसंत चव्हाण, प्रकाश सभावर, तिरुपती चरावत,  पापय्या चापले, लक्ष्मन गंधाम, फुलसिंग जाधव, जगनाथ दुर्गे, हनमंतु ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-09


Related Photos