महत्वाच्या बातम्या

 २ हजार ४०० चौरस फुटाच्या भव्य रंगमंचावर होणार जाणता राजाचे सादरीकरण


- आजपासून तीन दिवस जाणता राजा महानाट्य

- स्वावलंबी मैदानात प्रक्षकांसाठी ८ हजार २०० खुर्च्या

- ११० पोलिसांसह शंभरावर स्वयंसेवक राहणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने ६, ७ व ८ फेब्रुवारी रोजी १७ वर्षाच्या कालावधीनंतर दुसऱ्यांदा देशातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराच्या जन्मापासुन ते शिवराज्यभिषेकापर्यंतच्या कार्यावर आधारित जाणता राजा महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याची प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी झाली आहे.

स्वावलंबी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाणता राजा महानाट्यासाठी २ हजार ४०० चौरस फुटाचा भव्य रंगमंच तयार करण्यात आला असून अतिमहत्वाची, महत्वाची व सामान्य लोकांसाठी वेगवेगळी दालने असलेली ८ हजार २०० आसनाची प्रेक्षक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. प्रत्येक दालनामध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र व्यवस्थेसह वाहन तळाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रेक्षकांना महानाट्याचा शांततेत परिपूर्ण आनंद लुटता यावा, गर्दी होऊ नये यासाठी सुरक्षात्मक उपाय म्हणुन ११० पोलिस सुरक्षेसाठी तैनात राहणार आहे तसेच शंभराच्यावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे.

महानाट्य परिसरात वैद्यकिय मदत, प्रेक्षकांसाठी पॅकिंग खाद्याचे स्टॉल सुध्दा उपलब्ध असणार आहे. महानाट्य पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी मोफत उपलब्ध असलेल्या प्रवेशिका घेऊनच महानाट्य सुरु होण्याच्या अर्धातास आधी आसनस्थ व्हावे व महानाट्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos