शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्या : डाॅ. महेश्वर रेडी


-  शांतता समितीच्या सदस्यांची बैठक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
दहा दिवस चालणाऱ्या  गणेश उत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीत शांतता भंग होणार नाही याची  गणेश मंडळांनी काळजी घ्यावी , असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ. महेश्वर रेडी यांनी केले.
 येथील कत्रमवार सांस्कृतिक सभागृहात पोलिस उपविभागातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत  ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.कुणाल खेमणार, नगराध्याक्षा रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, उपविभगाीय अधिकारी महादेव खेडकर, अशोक येरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे डीजे वाजविण्यावर बंदी असल्यने गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा  उपयोग करावा. उत्सवादरम्यान इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाही,याचीही काळजी घेण्याचे आवाहन डाॅ.रेडी  यांनी केले. गणेश उत्सावामध्ये श्रध्दा,भक्ति आणि भाव महत्वाचा असल्याने मंडळांनी नियमभंग न करता उत्सव शांततेत पार पाडावा  असे आवाहन  जिल्हाधिकारी डाॅ.कुणाल खेमणार यांनी केले. गणेश मंडळानी पर्यावरणाचा सममोल राखावा, असे आवाहन नगराध्यक्ष रत्नमाला भेायर  यांनी केले. प्रास्ताविक पोलिस निरीक्षक कासार यांनी केले. संचालन संजय पडोळे यांनी ,तर आभार गजानन दरोडे यांनी मानले.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-08


Related Photos