सिटी माध्यमिक विद्यालय चंद्रपुर येथे व्यवसाय मार्गदर्शन कक्षाची स्थापना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
शाळेतील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायिक मार्गदर्शन व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन आव्हान पेलण्याची क्षमता निर्माण व्हावी,  यासाठी जिल्हा शैक्षणीक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था बाबूपेठ,चंद्रपुर यांचे अंतर्गत VGPG विभागमार्फत जिल्यातील प्रत्येक शाळेत व्यवसाय मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात यावे यासाठी नुकतेच पत्रक काढण्यात आले. 
 त्या अनुषंगाने सिटी माध्यमिक विद्यालय चंद्रपुर येथे व्यवसाय मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आणि यावेळी  व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी DIECPD चे जिल्हा समुपदेशक  विनोद वैरागडे  हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच या कर्यशाळेला शाळेचे मुख्यध्यापक  बारापात्रे  ,  रायपुरे  ,   घागी  व   उपासे  उपस्थित होते. अविरत प्रशिक्षक   रायपुरे  यांनी एक केस स्टडी सांगितली.   शिक्षिका मंजुषा  यांनी आवड, क्षमता, संधी विषयी माहिती सांगितली आणि  रायपुरे  यांनी सर्वांचे आभार मानले.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-08


Related Photos