सोनापूर येथे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली :
तालुक्यातील  सोनापूर येथे विरोधी पक्षनेते व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.  
विरोधी पक्षनेते विजय  वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने व स्थानिक आमदार निधी अंतर्गत सावली तालुक्यातील सोनापूर येथे खनिज विकास निधी अंतर्गत हनुमान देवस्थान सभागृह बांधकाम करण्यासाठी ७ लक्ष(सात लाख रुपये ) रुपये, तसेच आमदार विकास निधी अंतर्गत भोई -ढिवर समाज सभागृह बांधकाम करण्यासाठी ५ लक्ष रुपये तसेच हनुमान देवस्थान सभागृह बांधकाम करण्यासाठी ६ लक्ष निधी मंजूर करण्यात आले.  या  सर्व कामाचे भूमिपूजन  ना. विजय  वडेट्टीवार यांच्या हस्ते आज  ८ सप्टेंबर रोजी  करण्यात आले.
या भूमिपूजन  कार्यक्रमाला  यशवंत बोरकुटे, दिनेश पाटील चिटनुलवार, सोनापूर च्या सरपंच   अलकाताई दिवाकर भुरसे, माजी सरपंच   दिवाकर लक्ष्मण भुरसे  , उपसरपंच यशवंत गुरनुले , अविनाश  भुरसे, आशिष मनबत्तुलवार, सुनील बोमनवर, प्रदीप गड्डेवार,  कवेश्वर भांडेकर, किशोर बांबोळे, डोमाजी भांडेकर, गुड्डू भांडेकर,  पांडुरंग कोसरे तसेच गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-08


Related Photos