उद्या पालकमंत्री डॉ. परिणय फुके भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
राज्याचे सार्वजनिक बांधकाम,आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा डॉ. परिणय फुके हे ९ व ११ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दिनांक ९ व ११ सप्टेंबर २०१९ रोजीचा दौऱ्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पवनी येथे आगमन व विविध भूमिपूजन व लोकार्पण (गोसे (बु.) ११ लहान उपसा सिंचन योजना, पवनी उपसा सिंचन योजना, शेळी उपसा सिंचन योजना) कार्यक्रमास उपस्थित राहतील. स्थळ- गोसीखुर्द उजवा कालवा सा.क्र. ९१२० मी. वरील पंपगृहाच्या कार्यक्रम स्थळी. साकोली येथील विविध गणेश मंडळांना भेटी. साकोली विश्रामगृह येथे अगमन व व मुक्काम. ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता साकोली येथून शासकीय वाहनाने लाखनीकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता लाखनी येथे आगमन व संताजी मंगल कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय लोक कलावंतांच्या भव्य मेळावा कार्यक्रमास उपस्थित राहतील. सोईनुसार शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.
  Print


News - Bhandara | Posted : 2019-09-08


Related Photos