सफाई कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण अवजाराने वार करून खून - नागपूरमधील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील जुनी ओली दिवाण मंदिर जवळ कामठी नगर परिषद च्या एका सफाई कर्मचाऱ्याचा सकाळी साडे सहा दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण अवजाराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. मृतक सफाई कर्मचाऱ्याचे नाव सतीश किशोर धामती (वय २८ वर्षे रा.कोळसा टाल कामठी) असे आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र ५ हद्दीत येणाऱ्या नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील समता नगर परिसरात भर दिवसा सौरभ सोमकुवर नामक १९ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याच्या घटनेला १६ दिवस लोटत नाहीत तोच आज आणखी एक हत्या झाल्याने पोलिसांसमोर आव्हान वाढले आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतक सफाई कर्मचाऱ्याचे एक महिन्यांपूर्वी कामठी नागपूर मार्गावरील भाटिया लॉनमध्ये चांगलेच भांडण रंगले होते. या भांडणाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने त्याच्याच वस्तीतील रहिवासी हल्लेखोरांनी सकाळी सहा वाजता सतीशवर हल्ला चढवीत धारदार तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला आणि घटनास्थळाहुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवल. मात्र परिस्थिती नाजूक असल्याने उपचारार्थ आशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र काही वेळेतच डॉक्टर ने मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी मृतकने दिलेल्या बयानामध्ये आरोपीचे नाव सांगितले असल्याची माहिती आहे. पोलिसांनी यासंदर्भात अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम ३०२ अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे. तर मृतकाच्या पार्थिवावर पुढील उत्तरीय तपासणी साठी नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटल येथे शवविच्छेदनार्थ हलवण्यात आले.  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-08


Related Photos