महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबियांना उपचाराकरीता केली आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली येथील रहिवासी सुरेश आत्राम यांचा मुलगा श्रीनिवास आत्राम यांची काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसून दवाखान्यात उपचार करण्याकरीता आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचार करू शकेल नाही. 

सदर बाब वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी यांनी आविसं, काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालयात श्रीनिवासच्या आई वडीलांना घेऊन ही अडचण सांगितली. 

सुरेश आत्राम यांच्या मुलाला वेळीच उपचार मिळावे. यासाठी अजय कंकडालवार यांनी कोणताही विलंब न करता आत्राम कुटुंबियांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत केली. औषधोपचारासाठी आणखी अडचण भासल्यास कळवा असा धीर त्यांनी कुटुंबीयांना दिला. त्यामुळे आत्राम कुटुंबियांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी, उपसरपंच राजेश कोटपल्लीसर तसेच गोपाल सिडाम, मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, प्रमोद गोडसेलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos