मेडीगट्टा धरणाच्या पाण्यामुळे सिरोंचा तालुक्यातील हजारो हेक्टर सुपीक जमीन पाण्याखाली


- जमिनीचा मोबदला व शासकीय नोकरी देण्याची शेतकऱ्यांची मागणी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : 
 तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगट्टा धरणाच्या  पाण्यामुळे तालुक्यातील आसरल्ली, अंकिसा व गुमलकोंडा परिसरातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर सुपीक जमीन गोदावरीचा पात्रात वाहून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून जमीनीच्या  मोबदल्यात जमीन देण्यात यावी. तसेच शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 सामाजिक कार्यकर्ता व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम  तसेच परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी  होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे  मेडीगट्टा धरण सुध्दा पाण्याने  भरले आहे. वेळो वेळी धरणाचे पाणी अचानक पणे सोडण्यात येत असल्यामुळे धरणापासून दहा ते पंधरा किलो मीटर च्या कक्षेत गोदावरी तीरावर असलेल्या शेतकऱ्यांची हजारों हेक्टर सुपीक जमीन गोदावरीच्या  पात्रात वाहून जात आहे .  यामुळे शासनाने   नडीकुडा, कोतापल्ली, चिंतारेवला, अंकिसा, लक्ष्मीदेवीपेठा, गेर्रापल्ली, बोराईगुडम, आसरल्ली, सुंकरल्ली, टेकडामोटला, व गुम्मलकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे म्हणून घोषित करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई म्हणुण जमीनीच्या  मोबदल्यात जमीन देऊन, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी   तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम, तोरकर समय्या, सांबमजी सोमनपल्ली, सडवली गुडूरी, दामोधर सप्पिडी, पापय्या पाले, धर्मय्या कोठारी, नारायण पाले, जयाराम चौधरी आदींनी केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-08


Related Photos