विजेचा शॉक लागून देवलमरी येथील २५ बैल दगावले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
 तालुका मुख्यालयापासून १२ किमी  अंतरावर असलेल्या देवलमरी येथून वेंकटापूर कडे जाणाऱ्या विद्युत चे खांब देवलमरी नाल्यातुन गेले आहे.  सध्या पुराचे पाणी जास्त असून पाण्यामध्ये वीज प्रवाह तयार झाला. यामुळे नाल्यातून घरी परत जात असलेल्या  जवळपास २५ बैलांचा वीज प्रवाहाने मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. 
जिल्ह्यात सध्या पूर परिस्थिती आहे. नदी - नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे. देवलमरी ते व्यंकटपूर दरम्यान शेतकऱ्यांचे बैल चरण्यासाठी गेले होते. या परिसरात विजेचे तार खाली आले असून पाण्यात वीज प्रवाह होता. बैल पाण्यात उतरताच  त्यांना शॉक लागला व बैलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रचंड नुकसान झाले असून  लवकरात लवकर पंचनामा करून शासनाने आर्थिक नुकसान भरपाई  द्यावी अशी मागणी केली जात आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-08


Related Photos