घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू; दोन जखमी - तुमसर येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
सततच्या पावसाने घरावर भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाल्याची घटना तुमसर तालुक्याच्या सिंधपुरी येथे आज (८ सप्टेंबर) सकाळी घडली आहे. मिलकराम इसाराम शेंडे (५४) असे मृताचे नाव आहे. तर कुंदा नेवारे (२४) आणि निर्मला श्यामराव वगरे (५०) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी सकाळी ७ वाजता सगुणाबाई शेंडे यांच्या घराची भिंत शेजारच्या घरावर कोसळली. मातीच्या मलब्याखाली तीन जण दबले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही बाहेर काढले. मात्र मिलकराम मृत्यूमुखी पडला होता. जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोघींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-09-08


Related Photos