आष्टी - चंद्रपूर मार्ग अजूनही बंदच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजतापासून बंद झालेला आष्टी - चंद्रपूर मार्ग अद्यापही बंदच आहे. दुपारपर्यंत हा मार्ग सुरळीत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान गडचिरोली - आरमोरी, गडचिरोली चामोर्शी हे महत्वाचे दोन मार्ग तसेच काही अंतर्गत मार्ग सुरू झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गोसेखूर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. यामुळे आष्टी जवळील पुलावर अद्यापही काही प्रमाणात पाणी आहे. पाणी दुपारपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-08


Related Photos